पिचर्डे ग्रामपंचायत येथील अलका संजय पाटील यांची भडगाव दक्षता समिती सदस्या पदी निवडी

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील ग्रामपंचायतच्या सदस्या अलका संजय पाटील यांची नुकतीच भडगाव तालुका दक्षता समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व पाचोरा-भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारशीने व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांची निवड केले, तसेच त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले. अलका पाटील या पिचर्डे ग्रामपंचायत सदस्या आहेत

पिचर्डे येथील तंटामुक्ती अध्यक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी संजय वेलजी पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले

Protected Content