चोपडा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

WhatsApp Image 2019 10 04 at 7.39.22 PM

चोपडा, प्रतिनिधी | येथील आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने चोपाड्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.

आज शुक्रवार (दि. ४) रोजी संध्याकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे बंधू नरेश बळीराम सोनवणे, प्रा. ए. के. गंभीर, ऍड एस. डी. सोनवणे, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, शिवसेनेचे उपजिल्हासंघटक दिपकसिंग जोहरी उपस्थित होते.  तसेच  शहर प्रमुख आबा देशमुख, गटनेता भैया पवार, तालुका संघटक सुकलाल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी, विधानसभा क्षेत्र संघटक नामदेव पाटील, नरेश महाजन, प्रकाश राजपूत, नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेवक महेंद्र धनगर, देवीदास सोनवणे, सुनील पाटील, राजेंद्र जयस्वाल, सुनील बरडीया, सोपान पाटील, चंदू महाजन, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Protected Content