शाळा लगेच पुन्हा सुरु करणे सध्यातरी अवघड : मुख्यमंत्री


मुंबई (वृत्तसंस्था)
शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असंच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसे करायचे यावर विचार सुरु आहे. त्यामुळे तूर्त शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असेच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसे करायचे यावर विचार सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे. काही जणांचे म्हणणे होते ग्रीन झोनमधील शाळा सुरु करा. पण अशा अर्धवट पद्धतीने नको असे मी स्पष्ट सांगितले. वर्गाशिवाय शाळा सुरु कऱण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी मी अनेक तज्ञांशी बोलत आहे. ऑनलाइन शिक्षण मोठं आव्हान असून त्यासाठीही प्रयत्न सुरु आहे,असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Protected Content