नशिराबाद येथे ३ हजारांचा गुटखा जप्त

 

 

नशिराबाद प्रतिनिधी । शहरातील ख्वाजा नगर परिसरात बेकायदेशीर रित्या पानमसाला व गुटखा विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन यांनी धडक कारवाई करत ३ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पानटपरी धारकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील ख्वाजा नगर परिसरात साबीर रहेमान शेख (वय-३६) हा पानटपरी चालवितो . दरम्यान पानटपरीवर बेकायदेशीर  पानमसाला व गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सुवर्णा महाजन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी  १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत. पानटपरीधारक साबीर शेख यांच्या ताब्यात असलेल्या सुगंधी पानमसाला, सागर पान मसाला, माणिकचंद पानमसाला, राज विलास सुगंधी पानमसाला, विमल पान मसाला असा एकुण ३ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिकारी सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात पानटपरीधारक साबीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content