दारू घेण्यासाठी दुचाकी न दिल्याने मित्राचा निर्घृण खून

जळगाव प्रतिनिधी । दारू घ्यायला दुचाकी दिली नाही म्हणून मित्राने डोक्यात फरशी टाकून खून केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थ नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस रात्री उशीरा अटक केली.

अधिक माहिती अशी की, अरूण हरी पवार (वय-४५) रा. के.सीपार्क कानळदा रोड, कानळदा जकात नाक्यामागे शिवाजी नगर हे दुचाकीवरून घरोघरी जावून साडी विक्री करण्याचे काम करतात. त्यांच्या परिसरात अरूण पवार यांचे मित्र हरीचंद्र उर्फ सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल रा. इंद्रप्रस्थनगर, नवल मधुकर सपकाळे रा. के.एच.पार्क आणि मंगेश मधूकर जोहरे रा. राधाकृष्ण नगर हे राहतात. अरूण पवार हे आपल्या पत्नीला ‘तू स्वयंपाक करून ठेव मी बाहेर जावून येतो’ असे सांगून ५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास मित्र नवल सपकाळे यांच्या सोबत दुचाकीने बाहेर गेले. शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळील चिकनच्या दुकानावर दोघे आले. त्याठिकाणी सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल उभा होता. तिघे मिळून दारू पिण्यासाठी बसले. तिघांची दारू पिऊन झाल्यान नंतर काल्या उर्फ सचिन हा अजून दारू घेण्यासाठी अरूण पवार यांच्याकडे दुचाकीची चावी मागीतली. अरूण यांनी दुचाकीची चावी न दिल्याने काल्याला राग आला त्यांने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. व संतापाच्या भरात अरूण पवार यांच्या डोक्यात बाजुला पडलेली फरशी डोक्यात टाकली. यात अरूण हे गंभीर जखमी झाले. जखमीवस्थेत नवल सपकाळे यांनी गेंदालाल मील परिसरातील खासगी डॉक्टराकडे घेवून गेले व पुन्हा घटनास्थळी आणून सोडले. हा प्रकार घडल्यानंतर पत्नी रत्नाबाई अरूण पवार यांना माहिती पडल्यानंतर नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमीवस्थेत पतीला पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने देवकर जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी यांनी अरूण यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पत्नी रत्नाबाई अरूण पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात संशयित आरोपी हरीचंद्र उर्फ सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पथकाला संशयित आरोपीला शोधासाठी रवाना केले. रात्री उशीरापर्यंत संशयित आरोपी सचिन उर्फ काल्या अटवाल याला शहर पोलीसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण निकम हे करीत आहे.

jalgaon murder, jalgaon khun, city police station, jalgaon civil hospital, jalgaon covid care center, pi arun nikam jalgaon

Protected Content