जिल्ह्यात एसटीला बऱ्यापैकी गती ; एक हजारापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यासह राज्यात गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरण तसेच अन्य न्याय्य मागण्यांसंदर्भात संप सुरू आहे. वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आवाहनामुळे सध्यस्थीतीत 1हजार 113 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात एसटीला बऱ्यापैकी गती आली असल्याचे जळगावरमुख भगवान जगनोर यांनी सांगितले.

जिल्ह्यासह राज्यात गेल्या चार महिन्यापेक्षा अधिक काळावधीपासून एसटी कर्मचाऱ्याचा सम्प सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, संसर्ग वा आर्थिक परिस्थिती मुळे आतापर्यंत जिल्हयातील 47 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत तसेच अन्य न्याय्य मागण्यांसाठी संप सुरू आहे. जिल्हयात 11 आगारात सुमारे 4हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून 800 बसेस आहेत.

455 निलंबित तर 229 कर्मचारी बडतर्फ

दरम्यान जिल्हयात 5 नोव्हेंबरपासून सर्वच आगारातील संपात सहभागी झाले होते, आतापर्यंत या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 455 निलंबित तर 229 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत.

संपामुळे आर्थिक नुकसानीसह सर्वसामान्यांचे हाल
संपामुळे एसटी बसेस बंद असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून सर्वसामान्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर एसटी महामंडळाला करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

800 पैकी 193 बसेस धावतात विविध मार्गावर

जिल्हयात संपकाळात अनेक कर्मचाऱ्यावर बडतर्फ, निलंबन, प्रशासकीय बदल्या आदी कारवाई करण्यात आल्या आहेत. परिवहन अधिकारी प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे आतापर्यंत 1हजार 113 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. या माध्यमातून विविध मार्गावर शिवशाही, शिवनेरी, विठाईसह साध्या आशा 194 बसेस धावत असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले.

दररोज 23 लाखांचे उत्पन्न

जळगाव परिवहन विभागास संपापूर्वी दरदिवशी सुमारे 80 लाख रुपये महसुली उत्पन्न होते. सध्या 194 बसेस आणि 1113 कर्मचारी यांच्या माध्यमातून परिवहन सेवा सुरू करण्यात आली असून 23 लाख रुपये प्रतिदिनी महसूल मिळत असला तरी 57 ते 58 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. असे जळगाव विभाग प्रमुख भगवान जगनोर यांनी संवाद साधतांना सांगितले

Protected Content