Home क्राईम खेडी कढोली येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

खेडी कढोली येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

0
105

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी कडोली येथील २३ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.

 

मयूर नंदूलाल पाटील वय-२३ रा. खेडी कडोली ता.जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात माहिती अशी की, मयुर पाटील हा आई, वडील, भाऊ यांच्यासह खेडी कडोली येथे वास्तव्याला आहे. शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसताना मयूरने गुरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी घरातील नातेवाईक गोठ्यात गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. यावेळी त्याचे आई, वडील यांनी मुलाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला होता. शेजारच्या नातेवाईकांनी खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound