कोरोना : जिल्ह्यात आज नव्यान १९१ रूग्ण आढळले; ४६४ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण १९१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४६४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

तालुका निहाय आकडेवारी

जळगाव शहर-३५, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ -२४, अमळनेर-२, चोपडा-२५, पाचोरा-१७, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-४, एरंडोल-४, जामनेर-७, रावेर-९, पारोळा-१, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-५, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १९१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ५२९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४५ हजार ६४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ३०० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content