कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाला दोन लाखाचा धनादेश

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमध्ये एम.एस्सी. वर्गातील सर्व विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिंनीस “कै. प्रा.जयेश देसाई (कुलगुरू) व डॉ. अनुसया शेठ सुर्वण पदक“ प्रदान करण्यासाठी डॉ. अनुसया त्र्यंबकलाल शेठ यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांच्याकडे गुरूवारी सुपूर्द केला.

कै. प्रा. जयेश देसाई हे राजकोटच्या सौराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. तर डॉ. अनुसया शेठ या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत येथे आजीवन अध्ययन विभागातून सहायक संचालक म्हणून सन २००७ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. कै. प्रा. जयेश देसाई यांच्या त्या पत्नी आहेत.

डॉ. अनुसया शेठ यांनी ‘’कै. प्रा.जयेश देसाई (कुलगुरू) व डॉ. अनुसया शेठ सुर्वण पदक“ प्रदान करण्यासाठी दोन लाख रूपयांचा धनादेश कुलगुरूकडे दिला.

यावेळी प्र-कुलगुरू पी.पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील तसेच डॉ. अनुसया शेठ आणि जळगावच्या ग्रीन एन इको सोल्युशनचे मालक जिग्नेश शेठ उपस्थित होते.

Protected Content