राजकीय आत्महत्या करू नका : नगरसेवकांना आ. महाजन यांचा इशारावजा सल्ला

जळगाव प्रतिनिधी । सध्या महापालिकेत भाजपमधील सुरू असलेल्या फुटीवरून रात्री झालेल्या बैठकीत माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी नगरसेवकांना खडे बोल सुनावत राजकीय आत्महत्या करू नका असा इशारावजा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाला गळती लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे शनिवारी बैठक घेतील असे मानले जात होता. मात्र त्यांनी रविवारी रात्री पक्षातील नगरसेवकांची बैठक घेतली. भाजपातून फुटणारे नगरसेवक राजकीय आत्महत्या करीत असून त्यांचे राजकीय अस्तित्व संपणार असल्याचा इशारा आमदार महाजनांनी दिला.

आमदार गिरीश महाजन यांनी ज्या नगरसेवकांना पक्षाचे तिकिट देवून निवडून आले ते आयुष्यात नगरसेवक होऊ शकले नसते. सत्ता येते आणि जाते; परंतु फुटणार्‍या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार हे अटळ आहे असे सांगितले. तर भाजपमधून अजून नगरसेवक फुटू नये यासाठी बैठकीत रणनिती आखण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.