धरणगाव तालुक्यात ३३ नवीन कोरोना बाधित रुग्ण

धरणगाव प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरला संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यात तालुक्यातून ३३ रूग्ण नव्याने आढळून आले त्यापैकी ५ रूग्ण वराड बुद्रुक येथील आहेत अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ३३ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. यात शामखेडे १, पष्टाणे खुर्द ३, बोरगाव बुद्रुक १, सोनवद १, रोटवद १, पाळधी बुद्रुक २, पाळधी खुर्द १, एकलंग्न १, तेली तलाव १, धरणगाव १, भाटिया गल्ली २, मातोश्री नगर २, परिहार चौक २, पिल्लू मशिद १, जि. एस. नगर १, गणा बाप्पा नगर १, पद्मालय नगर १, जळगाव ४, नेहरू नगर १ असे रूग्ण आढळून आलेत.

आजचे रूग्ण पकडून ९९३ रूग्ण झाले असून यापैकी ३७ रूग्ण मयत झाले, ७६६ रूग्ण बरे झाले असून उर्वरित १९० रूग्ण हे उपचार घेत आहे. अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.

Protected Content