Home क्राईम जळगावात गॅरेजला आग

जळगावात गॅरेजला आग

0
164

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ट्रान्सपोर्ट नगरात असणार्‍या गॅरेजला रात्री आग लागली यात शेजारी उभ्या असणार्‍या ट्रकला भस्मसात होण्यापासून वाचविण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश लाभले.

याबाबत वृत्त असे की, ट्रान्सपोर्टनगरजवळील एका गॅरेजला गुरुवारी रात्री १०.२० वाजता अचानक आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक विभागाचे भारत छापरीया, रोहिदास चौधरी, देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, जगदीश साळुंखे, भगवान पाटील व गिरीश खडके यांच्या पथकाने आग विझवली. दरम्यान, या गॅरेजच्या शेजारी ट्रक उभा होता अग्निशामन दलाने तातडीने धाव घेतल्याने या ट्रकला आग लागली नाही. या संदर्भात औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound