चाकू हल्ल्यातील फरार आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पंचशील नगरात चाकू हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना बाजारपेठे पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ बाजार पेठ पो.स्टे.भाग ५ गुरन ५२/२०२० भा द वि ३२३,३२४,५०६,३४ प्रमाणे दिनांक १८.०२.२०२० रोजी ११.१९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी प्रमोद मुरलीधर तायडे (रा.पंचशील नगर भुसावळ) दि.१७.०२.२०२० रोजी रात्री अकराच्या सुमारास भांडण सोडविल्याचा राग आल्याचे कारणावरुन फिर्यादीस तसेच मित्र मनोहर आत्माराम सुरळकर अश्या ना चाकुने वार करून जखमी केले म्हणून गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी शेख जाकीर शेख रज्जाक (वय-४६ रा.पंचशील नगर भुसावळ) व शेख समीर शेख जाकीर (वय-२० रा.पंचशील नगर) हे फरार झाले होते. त्यांना बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.तस्लिम पठाण,पो.हे.कॉ वाल्मिक सोनवणे,पो.ना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, पो.कॉ.विकास सातदिवे, तुषार पाटील,ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली.

Protected Content