जळगावात कंटेनरच्या कॅबिनला शार्टसर्किटमुळे आग; बंबामुळे आग आटोक्यात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मुंबई येथून सुप्रीम पाईप कंपनीचे लाखो रुपयांचे पावडर घेऊन जळगावात आलेल्या कंटेनरला सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. चालकाच्या कॅबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळाली असुन वेळीच अग्निशमन बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली आहे. यात कंटनेरची कॅबिनपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

अधिक माहीती अशी की, शहरातील श्री यश रोड लाईनचाचे (एम.एच.46 एफ 8507) क्रमांकाचे कंटेनर मुंबई येथील लावाशिवा येथून सुप्रिम पाईप कंपनीचे लाखो रुपये किमतीचे पावडर घेवून सोमवारी जळगावात पोहचले. अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या जळगाव पिपल्स बँकेच्या समोर चालकाने कंटेनर थांबविले. पाहणी केली असती, कॅबिनच्या खालच्या बाजूने ऑईलची गळती होत होती. याबाबत चालक गोविंद पाल याने श्री यश रोड लाईनचे मालक किशोर मेश्राम यांना कळविले. यानंतर चालक प्रसाधन करण्यासाठी निघून गेला. प्रसाधन आटोपून परतला असता कॅबिलमधून धुर निघत होता, काही वेळाचे आगीत रुपांतर झाले. माहिती मिळाल्यानुसार मेश्राम यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. व अग्निशमन कार्यालयाला फोनवरुन घटना कळविली. त्यानुसार महापालिकेचा अग्निशमन बंब पोहचला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचार्‍यांनी पाण्याचा मार करत आग विझविली. या आगीत कंटेनरची कॅबीने पूर्णपणे खाक झाली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/806199296622019/

Protected Content