फेसबुकवरून गृहिणीची बदनामी; सायबरला गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील एका महिलेचा फोटो सुनील खराटे नामक अनोळखी व्यक्तीने स्वत:च्या फेसबुकवर ठेवून त्या महिलेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय गृहिणीचा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गृहिणीचा फोटो सुनील खराटे नामक व्यक्तीच्या फेसबुकवर असल्याचे या महिलेच्या लक्षात आले. या महिलेशी कोणतीही ओळख नसताना सदर व्यक्तीने महिलेचा फोटो वापरून तिची बदनामी केली. हा प्रकार गुरूवार २८ सप्टेंबर रोजी ते शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी महिलेने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

Protected Content