जळगाव तालुक्यात ६ अवैध गावठी हातभट्ट्या उध्दवस्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील गावांमध्ये अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणार्‍यांवर तालुका पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत ६ दारुच्या भट्ट्या उद्धवस्थ करण्यात आल्या असून शेकडो लिटर दारु नष्ट करण्यात आली. याप्रकरणी रविवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता ६ जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक, भोलाणे, पडसोद, असोदा व सावखेडा यासह ग्रामीण भागांमध्ये मोठया प्रमाणात अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील शांताराम व्यंकट सोनवणे (वय-६०) यांच्याकडून १ हजार २०० रुपये किंमतीची ३० लिटर दारु, भोलाणे येथील राकेश मधुकर कोळी (वय-२७) याच्याकडून १ हजार ५०० रुपये किंमतीची ३० लिटर दारु, पडसोद येथील रतिलाल राजाराम सोनवणे (वय-६१) याच्याकडून हजार रुपये किंमतीची २५ लिटर दारु, असोदा येथील विजय प्रकाश कोळी (वय-३८) याच्याकडून १ हजार ५०० रुपये किंमतीची ३० लिटर दारु, सावखेडा बु. येथील सिद्धार्थ मधुकर सोनवणे (वय-४२) याच्याकडून १ हजार २०० रुपये किंमतीची ३० लिटर व गोरख सोनू सोनवणे (वय-३५) याच्याकडून हजार रुपये किंमतीची २५ लिटर गावाठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध रविवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content