जळगाव पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया सुरु

WhatsApp Image 2020 01 02 at 11.50.08 AM

जळगाव, प्रतिनिधी | आज दुपारी ३ वाजता जळगाव पंचायत समितीची सभापती व उपसभापती निवड होणार आहे. जळगाव पंचायत समितीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने त्यांचा सभपती होणे निश्चित मानले जात आहे.

जळगाव पंचायत समितीमध्ये १० सदस्य असून यात ७ सदस्य हे एकट्या शिवसेनेचे आहेत. तर २ सदस्य भाजपा व १ सदस्य हा अपक्ष आहे. मागील वेळेस अनुसूचित जातीचे आरक्षण सभापतिपदी निवडीसाठी जाहीर झाल्याने शिवसेनेकडे बहुमत असतांना भाजपच्या यमुना दगडू रोटे यांची वर्णी लागली होती. यावेळेस सभापतिपडाचे आरक्षण हे सर्वसाधारण पुरुषासाठी जाहीर झाले असल्याने शिवसेनेचे नंदलाल शांताराम पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना. गुलाबराव पाटील जिल्ह्यात आल्यानंतर पंचायत समिती सभापती निवड होत असून ना. पाटील हे या निवडीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही निवड पीठासन अधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
सकाळी ११ ते दुपारी १ – नामनिर्दशन पत्र वितरण – स्वीकार
दुपारी ३ वा. – अर्ज छाननी, माघारी, निवडीची घोषणा

Protected Content