खंडेराव नगरातून अल्पवयीन मुलाला फुस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात १४ वर्षीय मुलगा आपल्या आईवडिलांसह राहतो. २९ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलाल अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले.प रिसरात अल्पवयीन मुलाचा शोध घेतला परंतू आढळून आला नाही. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

 

Protected Content