जागेच्या वादातून तरूणाला फावड्याने मारहाण

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागेच्या वादातून तरूणाला फावड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना जामनेर तालुक्यातील गोंदगाव येथे घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू रहेमान तडवी (वय-४०) रा. गोंदेगाव ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राजू तडवी हा ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेजवळ उभा असतांना जागेच्या वादातून गावातील किरण चरखा तडवी, फरीद चरखा तडवी, जाबीर चरखा तडवी आणि चरखा मानखा तडवी यांनी राजू तडवी याला दगडाने व फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत राजू तडवी यांच्या फिर्यादीवरून   किरण चरखा तडवी, फरीद चरखा तडवी, जाबीर चरखा तडवी आणि चरखा मानखा तडवी यांच्यावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणी नामदार तडवी करीत आहे.

Protected Content