मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | ओबीसी आरक्षण संदर्भात राज्य सरकारने पारित केलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केलीआहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण मार्ग मोकळा झाला असून आगामी सहा महिन्यात ओबीसी आरक्षणानुसार निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुपारी महाविकास आघाडीचे ओबीसी आरक्षण समितीचे सदस्यानी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भात सुधारित विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले होते. या सुधारित विधेयकावर राज्यपाल कोशारी यांनी स्वाक्षरी केली, त्यामुळे आगामी काळात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीतर्फे ओबीसी डेटा संकलन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
परिणामी आगामी सहा महिन्यांत ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी झाली आहे.