मु.जे. महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती अभियानासाठी लघुचित्रपटाची निर्मिती

M J College news

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व जनसंवाद व पत्रकारिता विभाग, मू.जे.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “ मतदार जनजागृती अभियान” करिता लघुचित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.राणे, जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार, केतकी सोनार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी लिखित सहा कथाविषय आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी अपूर्वा वाणी लिखित “पहिले मतदान” या लघुचित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन अभय सोनवणे व सहदिग्दर्शन आकाश बाविस्कर हे करत आहेत.तर चलचित्रीकरण संजय जुमनाके व यात सहभागी कलाकार राहुल पवार,सोहम वाणी, जितेंद्र शिंपी हे आहेत. मतदार जनजागृती अभियानाकरीता प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Protected Content