Home क्राईम आव्हाणे येथील तरूण झाला बेपत्ता

आव्हाणे येथील तरूण झाला बेपत्ता

0
134

जळगाव तालुका पोलीसात बेपत्‍ता झाल्याची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील २३ वर्षीय तरूण घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याचे रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राहूल संजय शिंदे वय २३ रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राहूल संजय शिंदे हा तरूण आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे वास्तव्याला आहे. रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता त्याची कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound