बेताल वक्तव्य करणारे भाजपा खा. रमेश बिधुडी यांचा जाहीर निषेध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी विखारी, जातीवादी, धार्मिक वक्तव्य केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे. तसेच बेताल वक्तव्य करतांना त्यांना समर्थन देणारे खा. डॉ. हर्षवर्धन व खा. रविशंकर प्रसाद यांचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला.

निषेधाचे निवेदन तहसीलदार प्रविण चव्हाणके यांना देण्यात आले. याप्रसंगी पाचोरा जमियत उलमाचे अध्यक्ष हाफीज मो. जहुर खान, उपाध्यक्ष मौलाना मुख्तार अहमद नदवी, सचिव अब्दुल अजीज खाटीक, रा. काॅं. चे शहर अध्यक्ष अजहर खान, बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, मोहसीन मणियार, साजीद कुरेशी, हारुन बागवान, फारुख पिंजारी, हाफीज जब्बार, मुख्तार अहमद, सैय्यद गफ्फार, सैय्यद गयास यांचे सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

२१ सप्टेंबर रोजी लोकसभेत भाजपा चे खासदार रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांना धर्मवाचक शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्याने संसदेचे ज्याप्रमाणे पवित्र भंगले त्यापेक्षा जास्त आम्हा मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे रमेश बिधुडी यांच्या त्या वक्त्याचा जमियत उलमातर्फे जाहीर निषेध करीत आहेत.

रमेश बिधुडी जेव्हा लोकसभेत एका खासदाराला नव्हे तर तो ज्या धर्माशी संबंधीत आहे, अश्या “इस्लाम” धर्मा बद्दल व मुस्लीम समाजाविषयी विखारी वक्तव्य करीत होता. आणि असा करीत असतांना त्याच्या शेजारी बसलेले खासदार डॉ. हर्षवर्धन आणि खासदार रविशंकर प्रसाद ज्याप्रमाणे हसत होते व एक प्रकारे ते रमेश बिधुडीला उत्तेजन देत असून समर्थन करीत होते. त्या दोघांचा सुध्दा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे निवेदन जमियत उलमातर्फे तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना देण्यात आले आहे.

Protected Content