अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवारांना दिलेल्या अधिकच्या बोनस गुणांमध्ये इतर मुलांवर अन्याय करण्यात आलेल्या भेदभावासंदर्भात सोमवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२२ च्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम २०११ मध्ये राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एनसीसी प्रमाणपत्र श्रेणी क, ब, अ धारक उमेदवार यांना अनुक्रमे ५ टक्के, ३ टक्के, २ टक्के अधिकचे बोनस गुण देण्यात आले. या अधिकचे गुण देण्यामुळे सर्व अंतिम गुण तालुक्यामध्ये उर्वरित पात्र उमेदवारांचे गुणांचे नुकसान होत आहे. त्याऐवजी एनसीसी प्रमाणपत्र धारकांना विशिष्ट राखीव कोटा देण्यात यावा. जेणेकरून उर्वरित उमेदवारांना यामुळे गुणतालिकेमध्ये फटका बसणार नाही. यामागण्यांसाठी सोमवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी रामेश्वर पाटील, दीपक राजपूत, देविदास पाटील, सनलाइट क्लास, वासुदेव बोरसे, संगर्ष धनगर, संजवणी महाले, योगिता धनगर यांच्यासह आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

Protected Content