संशयिताला सहकार्य करणारे पोलीस सहआरोपी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंदनगर पोलीस स्थानकातील खंडणी प्रकरणात संशयितांना सहकार्य करणार्‍या तीन पोलिसांना आता सहआरोपी करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, २५ जून रोजी क्रेझी होम कॉटेजला लग्न समारंभाबाबत रामानंदनगर पोलिसांनी मालकाला समज देऊन तशी नोंद केली होती. त्यानंतर सोशल मीडियात बातम्या प्रसारीत करण्यात आल्या. या प्रकरणात ५० हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये दिल्यानंतर प्रकरण मिटवण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर २५ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी संशयित सोनार याला कर्मचार्‍यांनी पोलिसांची गोपनिय माहिती पुरवून सहकार्य केल्याबाबत पोलिसांना संशय होता. त्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी चौकशी केली. यामध्ये पोलिस नाईक प्रदीप आनंदा चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल शरद अभिमन्यू पाटील व पोलिस नाईक नीलेश कांतीलाल दंडगव्हाळ यांनी संशयितांना माहिती पुरवल्याचे निष्पन्न झाले. यामुळे या तिघांना आता या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.

Protected Content