रस्ता ओलांडत असताना दुचाकीची तरुणाला धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ममता बेकरी जवळ टोल नाक्याच्या नजीक रस्ता ओलांडत असताना दुचाकीने तरुणाला धडक दिल्याने तरुण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवार २ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील तोल काट्याजवळ प्रकाश धन्याराम भाटी हे मूर्ती काम करणारे व्यावसायिक वास्तव्यास आहेत. ३० जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रकाश भाटी हे रस्ता ओलांडत असताना त्यांना (एमएच १९ डीजी १९८५) या क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रकाश भाटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना दुखापत झाली आहे. या अपघात प्रकरणी प्रकाश भा यांनी रविवारी एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली. या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

Protected Content