विद्यापीठाचा ३७.६१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२१-२२ च्या ३०५.१७  कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाला अधिसभेच्या ऑनलाईन बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात ३७.६१ कोटी रुपयांची तुट दर्शविण्यात आली आहे.  प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. 

मंगळवार दि.२९ जून रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. दि.२५ मार्च रोजी अधिसभेची बैठक तहकुब झाली होती ती बैठक आज घेण्यात आली. या अर्थसंकल्पात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कारासाठी २५ लाख, स्वातंत्र्य  दिन अमृत महोत्सवी वर्षासाठी २५ लाख तसेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल मोलगी येथे विद्यापीठ संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी ४० लाखाची तरतूद हे या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. अर्थसंकल्पात परिरक्षणासाठी २०१.५८ कोटी रूपये, योजनांतर्गत विकासासाठी ६२.३३ कोटी आणि विशेष कार्यक्रमांसाठी/ योजनांसाठी ५१.२६ कोटी अशी एकूण खर्चासाठी ३०५.१७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात उत्पन्नासाठी तरतूद २६७.५६ कोटी इतकी असल्यामुळे रूपये ३७.६१ कोटी इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. खर्चात बचत करून ही तुट भरून काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.  विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण व आदिवासी भागातील असून त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या गरजा व अपेक्षा तसेच यात मोठ्या प्रमाणावर झालेले बदल, ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार याबाबींचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नंदूरबार येथील आदिवासी अकादमी अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात  एक  कोटी पाच लाख रुपयांची  तरतूद करण्यात आली आहे. यात आंतरशाखीय विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांकडून आदिवासी ग्रामीण भागातील उपक्रमांसाठी विविध संशोधन प्रकल्प राबविले जाणार आहेत. सहयोगी सहकारी शिक्षण सहाय्य या योजनेंतर्गत संशोधन करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव यावा म्हणून ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी २५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प ही नविन योजना राबविण्यासाठी ५० लाख रूपयांची, विद्यापीठ प्रशाळा केंद्र व उपकेंद्रासाठी १३.४९ कोटी, परीक्षा व मूल्यमापन विभागासाठी २६.८२ कोटी, विद्यार्थी कल्याण विभागासाठी ६.२५ कोटीची तरतूद असून यात ‘कमवा व शिका योजना’, युवारंग, दत्तक योजना, विद्याधन योजना आदी ३७ योजनांचा समावेश आहे. क्रीडांतर्गत १३ योजनांसाठी १ कोटी ५५ लाख, विद्यार्थी व विद्यार्थिंनी वसतीगृहासाठी ४० लाख्, ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी २६ लाख, आरोग्य केंद्रासाठी २१ लाख, बहिणाबाई अध्यासन भवनासाठी १.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण, आरोग्य, साहित्य अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक अथवा अशैक्षणिक पात्रता धारक असलेल्या मान्यवरांचा अहवाल प्रस्ताव मागवून त्यांना ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ २०२१-२२ पासून देण्यात येणार असून त्यासाठी २५ लाखांची तरतुद करण्यात आली आहे. तर स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी २५ लाखांची तरतुद केली आहे. उच्च ‍शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे म्हणून मोलगी येथे विद्यापीठ संचलित महाविद्यालयासाठी ४० लाखांची तरतुद करण्यात आली आहे. राजश्री शाहू महाराज बस पास ५० टक्के सवलत योजना सुरू राहील.  व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत विष्णू भंगाळे,  प्रा.गौतम कुवर, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य ए.टी.पाटील, प्राचार्य लता मोरे, जी.वाय.पाटील, दिनेश नाईक, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य पी.पी.छाजेड, दिनेश खरात, प्राचार्य अशोक खैरनार, सुरेश पवार, प्राचार्य अनिल लोहार,डॉ.प्रशांत सरोदे, अमोल मराठे, डी.पी.नाथे, प्रा. एस. आर. चौधरी, नितीन ठाकूर, मनिषा खडके, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.सुनील गोसावी यांनी भाग घेतला.

प्रा.गौतम कुवर व विष्णू भंगाळे व नितीन ठाकूर यांनी काही सूचना या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने केल्या. सदस्यांच्या शकांचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस. आर.गोहिल यांनी निरसन केले. अनेक सदस्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेश, विकासाभिमूख आणि विद्यार्थी केंद्रित असा असून कोरोनाच्या काळातही उभारी देणारा असल्याची भावना व्यक्त केली. चर्चेनंतर अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.  विषयपत्रिकेतील लेखापरिक्षण अहवालाच्या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी समिती नियुक्त करून आक्षेपांची पुर्तता करून अधिसभेसमोर हा अहवाल पुन्हा मांडला जाईल असे सांगितले. प्रश्नोत्तरांचा तास तहकुब करण्यात आला. सभेच्या शेवटी बोलतांना प्रभारी कुलगुरू प्रा.वायुनंदन यांनी या बैठकीत विकास विषयक चर्चा सदस्यांनी पोटतिडकीने केली या बद्दल आनंद व्यक्त केला. बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित होते.सदस्य सचिव तथा प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर यांनी बैठकीचे सुत्रसंचालन करून आभार मानले.  या सभेत प्राचार्य आर.एस.पाटील,

प्रा.डॉ.पी.पी.छाजेड, प्राचार्य अशोक राणे, बी.पी.पाटील, एस.आर.गोहिल, डी.पी.नाथे, डॉ.अनील चिकाटे,  प्रा.पंकजकुमार नन्नवरे,  डॉ.दिनेश पाटील,  प्रा.मनिष जोशी, प्राचार्य एल. पी. देशमुख,  प्राचार्य ए. पी. खैरनार, प्राचार्य ए. टी. पाटील, प्राचार्य लता मोरे, प्राचार्य नाना गायकवाड,  प्राचार्य डॉ. अनील लोहार,  प्राचार्य मिनाक्षी वायकोळे, प्राचार्य राजू फालक,  अॅड.संदीप पाटील,  प्रा.अनिल पाटील,  प्रा. प्रकाश अहिरराव,  प्रा.एकनाथ नेहेते,  प्रा.गौतम कुवर,  प्रा.मोहन पावरा,  प्रा.सुनील गोसावी, प्रा.किशोर कोल्हे,  प्रा. संध्या सोनवणे,  प्रा. भुषण चौधरी,  प्रा. अजय सुरवाडे,  प्रा. मधुलिका सोनवणे, विष्णू भंगाळे, अमोल मराठे, अमोल सोनवणे, दिनेश नाईक, दिनेश खरात, नितिन ठाकूर, विवेक लोहार, मनिषा चौधरी,  डॉ. प्रशांत सरोदे,  प्रकाश पाठक,  सुरेश पवार, राजेंद्र दहातोंडे,  गिरीष पाटील,  जी. वाय. पाटील, भुपेंद्र गुजराथी आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/540943640370072

 

Protected Content