ग्रा.पं.च्या जागेवर सासऱ्याच्या अतिक्रमणामुळे सून सरपंच सदस्या पदावरून पायउतार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी  – चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु. येथील ग्रा.पं.च्या जागेवर सासऱ्याच्या अतिक्रमणामुळे सरपंच सपना गुलाब पाटील यांना सरपंच सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु. ग्राम पंचायतीच्या जागेवर सासऱ्याने अतिक्रमण करीत घराचे बांधकाम केले आहे. यामुळे त्यांच्या सुनेस सरपंच सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे, अशी तक्रार बोरखेडा बु. येथील रहिवासी देवीदास पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विवाद अर्जाद्वारे दाखल केली होती, याची सुनावणी होऊन बोरखेडा बु।। येथील ग्रा.पं.च्या जागेवर सासऱ्याच्या अतिक्रमणामुळे सरपंच सपना गुलाब पाटील यांना सरपंच सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.

बोरखेडा बु।। येथील ग्राम पंचायतीचे सरकारी जागेवर सासऱ्याने राहते घराचे बांधकाम केल्यामुळे सपना गुलाब पाटील याना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे असा अर्ज देवीदास पंडित पाटील यांनी दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सपना पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरुन दिनांक १६ मार्च रोजी अपात्र ठरविले आहे.

बोरखेडा बु।। येथील सरपंच सपना गुलाब पाटील यांचे सासरे दादाजी त्र्यंबक पाटील यांनी ग्राम पंचायतीच्या मालमत्ता क्र. 848 क्षेत्रफळ 464 या शासकीय जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करीत राहत्या घराचे बांधकाम केले आहे. त्याचा लाभ सरपंच एकत्र कुटुंबातील सदस्य घेत आहेत. त्यामुळे सरपंच सपना गुलाब पाटील सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. यासंदर्भात देवीदास पंडित पाटील यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विवाद अर्ज क्र-37/ 021.नुसार तक्रार दाखल केली होती.

त्यावर चौकशी व सुनावणी होऊन सरपंच सपना पाटील यांचे सासरे यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे ग्रा.प. दप्तरी भोगवटा नाव लावुन घेत सदरची शासकीय जागा मिळकत ताब्यात ठेवून राहते घराचे बांधकाम केले आहे. सरपंच सपना पाटील यांनी स्वत: शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले नसले तरी कुटुंब प्रमुख म्हणून सासऱ्याने सरकारी जागेवर अतिक्रमण केले असले तरी, सुन प्रत्यक्ष लाभार्थी ठरते व आहे. असा युक्तिवाद विश्वासराव भोसले यांनी केला. त्यांचा हा यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी राऊत यांनी सपना पाटील यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. या निकालामुळे जिह्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेत मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार देवीदास पंडित पाटील यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले. यांनी काम पाहिले. या निकाला कडे तालुक्याचे लक्ष्य लागले होते.

Protected Content