Home क्राईम धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी

0
104

जळगाव प्रतिनिधी । रेल्वेने भादली येथे येत असलेला तरुण रेल्वेतून पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी मनमाड येथे घडली.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिथून अशोक सपकाळे (३२, रा. भादली, ता. जळगाव) हा तरुण भादली येथे येत असताना मनमाड येथे त्याचा रेल्वेतून तोल गेला व तो खाली पडला. यात त्याला मोठी दुखावत झाली. प्राथमिक उपचार करून त्याला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.


Protected Content

Play sound