Home Cities जळगाव यावल येथील तरुणाने घेतले विष; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

यावल येथील तरुणाने घेतले विष; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

0
103

 

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून राग आल्याने यावल तालुक्यातील दहीगाव येथील 28 वर्षीय तरुणाने शुक्रवारी सकाळी विष प्राशन केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहीगाव येथील नरेंद्र यादव पाटील (२८) या हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. घरात वृद्ध आई-वडील असून एका भावाचे या पूर्वीच निधन झाले आहे. दहीगाव येथे शुक्रवारी यात्रा असल्याने गुरुवारी रात्री संदलच्या कार्यक्रमात नरेंद्र हा उत्साहाने सहभागी झाला होता. मात्र शुक्रवारी सकाली किरकोळ कारणावरून त्याने रागाच्या भरात घराजवळ विष प्राशन केले. ही घटना लक्षात येताच त्याला नातेवाईक व आजूबाजूच्या मंडळींनी जिल्हा रुग्णालयात हलविले. येथे त्याच्यावर तातडीचे उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.


Protected Content

Play sound