प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे नवे विश्वाचे आदर्श – प्रा. तायडे

123

 

फैजपूर प्रतिनिधी । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोटी जणांचा उद्धार करून फक्त दलित समाजालाच नव्हे तर अवघ्या मानवजातीला आदर्शवत कार्य केले. बाबासाहेब यांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाचे प्रा.विजय तायडे यांनी केले. तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेत ते बोलत होते.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय करून देत बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व संपूर्ण समाजाला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक योगदानाबद्दल विवेचन केले. तसेच महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने तेव्हाच साध्य होईल, जेव्हा आपण सारे बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक होऊ, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.डॉ. उदय जगताप, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर, प्रा.डॉ.डी.एल.सूर्यवंशी, प्रा.डॉ.मारुती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर यांनी केले.

यांनी केले प्रयत्न
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.डी.एल सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.डॉ.मारुती जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, सिद्धार्थ तायडे, पराग रणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content