जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयातील गोडावूनमध्ये चोरी

sambhaji nagar chori

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयातील आरोग्य वर्कशॉपमधील गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी 11 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सोमवारी दुपारी उघडकीस आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कार्यशाळा (आरोग्य सेवा)चे सेवा अभियंता विजय राजेंद्र नारखेडे (वय-37) रा. पारक नगर यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की, 13 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वैद्यकिय महाविद्यालयाच्या परीसरात अधीष्ठात यांच्या निवासस्थानासमोर आरोग्य पार्क जवळील असलेल्या गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून गोडावून मधील निरूपयोगी वस्तूंची चोरी करून अंदाजे 11 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी विजय नारखेडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content