निर्भया प्रकरण : दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली

SupremeCourtofIndia

नवी दिल्ली प्रतिनिधी । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची पुनर्विचार (क्युरेटिव्ह पिटिशन) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २२ जानेवारीला दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी केले होते.

पतियाळा हाऊस कोर्टानं दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्या.एन.व्ही.रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर.एफ.नरीमन, आर.भानुमती, न्या.अशोक भूषण यांच्या खंडपीठाने एकमताने दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

Protected Content