अपंगत्व व आजारपणामुळे चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । अपंगत्व आणि आजारपणामुळे 14 वर्षीय मुलाचा आज सकाळी मृत्यू झाला असून याप्रकरणी रामांनद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहीत अशी की, देवदत्ता बंडू ठाकरे (वय-14) रा. हरीविठ्ठल नगर जळगाव, हा गेल्या अनेक महिन्यांपासून अपंगत्व व आजाराने ग्रस्त असल्याने पुर्णपणे परावलंबी होता. त्याचे वडीलांचे दोन वर्षांपुर्वी निधन झाले होते. एकट्या आईने त्याचा एक वर्ष संभाळ केला. दुदैवाने आईदेखील मागील वर्षी मयत झाल्या. देवदत्ता एकाकी पडल्याने येथील रहिवाशी आनंद हटकर यांनी त्यांचा संभाळ केला. दरम्यान त्याचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाल्याने त्याला निट जेवणही करता येत नव्हते. दरम्यान आज 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या पुर्वी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. भोळे मॅडम यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी डॉ. भोळे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल फेगडे आणि पो.कॉ. योगेश पवार करीत आहे.

Protected Content