ऑफलाईनसह ऑनलाईन परीक्षेचा पर्याय द्या,

जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी  – सद्यस्थितीत खान्देशात वाढत्या उन्हाचे तापमान तसेच राज्यात एसटी संप आणि दुसरीकडे रेल्वे सर्वसाधारण तिकीट सेवा देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी परीक्षांसाठी ऑफलाईनसह ऑनलाईन परीक्षेचा पर्याय देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनतर्फे उच्च शिक्षण विभागाचे, सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण देण्यात आले.

संसर्ग प्रादुर्भाव पाश्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून राज्य, केंद्र सरकारकडून निर्बध लावण्यात आले होते. या काळात विद्यापीठ अनुदान आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश,मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयीन शिक्षण आँनलाइन पद्धतीने चालु होते. परन्तु जिल्ह्यात तसेच राज्यात संसर्ग प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा नियमितपणे घेण्यात येत आहेत.
सध्याचे शैक्षणिक सत्र आपण आँनलाइन पद्धतीनेच सुरु केले असून १ फेब्रुवारी ते ५ एप्रिल पर्यत ६० ते ६५ टक्के अभ्यासक्रम ओनलाइनच शिकवून पूर्ण झालेले आहे.
सध्यस्थितीत एस.टी.कर्मचाऱ्याचा संप, रेल्वे प्रशासनाकडून मासिक पास वा सर्वसाधारण तिकिटे देखील सुरु केलेली नसून दळणवळणाची मुख्य व्यवस्थाच बंद आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थी आँनलाइन शिक्षण घेऊन आँफलाइन परीक्षेसाठी कसे पोहचणार याचा विचार राज्य शासन आणि विद्यापीठ प्रशासनाने केलेला नाही. प्रवासी साधनाच्या अभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी लक्षात घेता उन्हाळी सत्राच्या परीक्षा ह्या आँनलाइन व आँफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्यावतीनं निवेदन देण्यात आले. तसेच मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालय उन्हाळी परीक्षा आँनलाइन पद्धतीने घेणार आहेत जर मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालये विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ शकतात तर आपण का नाही ?
असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

यावेळी उत्तर महाराष्ट्र सहसचिव दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, जिल्हा सचिव रोहित काळे, अतुल उबाळे, सुकलाल सुरवाडे, संदिप बोरसे
आदि उपस्थित होते.

Protected Content