एमआयडीसीतील गोडावूनमधून सामानांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील ई सेक्टरमधील एका गोडावूनमधून फिटींग वायर बंडालासह इतर साहीत्य चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी परिसरात प्रमोद श्रीधर पाटील (वय-६८) रा. जिल्हा पेठ जळगाव हे आपल्या परिवारासह वस्तव्याला आहे. एमआयडीसीतील ई सेक्टरमधील प्लॉट ३६ या जागेत कंपनीसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान ११ जुलै सायंकाळी ७ ते १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या जागेतून कंपनीत लागणारे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रमोद पाटील यांनी सर्वत्र माहिती घेतली. चोरी झाल्याबाबत काहीही माहिती न मिळाल्याने अखेर बुधवारी १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे.

Protected Content