बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या फुले मार्केटमधील दोन दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने आढळून आली असून तीन जणांविरुद् शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुले मार्केटमध्ये हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने असल्याची माहिती मिळाल्यावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता  साईश्रद्धा नॉवेल्टी, जय अम्बे कॉस्मेटीक या दुकानांमध्ये तपासणी केली. त्यावेळी तेथे बनावट सौंदर्य प्रसाधनांवर हिंदुस्थान लिव्हर कंपनीचे नाव वापरून त्याची विक्री केली जात होती. कंपनीचे हुबेहुब उत्पादने तयार करून  ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने असल्याचे तेथे आढळून आले.

या प्रकरणी कंपनी अधिकारी नयनतारा डेव्हिड डेमी (रा. बंगलुरू, कर्नाटक) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संतोष अरुण देवरे (३६, रा. कांचननगर), जगदीश गुलाबराव नागदेव (३२, रा. भुसावळ), विशाल कमलकुमार ढिंगवाणी (२४, रा. कंवरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहेत.

Protected Content