जळगावात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात हॉस्टेलवर राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी जळगावात शिक्षण घेत आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉस्टेलमध्ये राहते. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी तिने नातेवाईकांच्या नंबरवर व्हाईस मॅसेज टाकला. ज्यात ती म्हणते की, ‘घरचे लोक मला शिक्षण करू देत नाही, मला मोठे व्हायचे आहे, आयपीएस बनायचे आहे. आता मी काही मोठी नोकरी करूनची घरी येईल’, गेली. तर अज्ञात व्यक्तीने मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आई दिली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश शिंदे करीत आहे. 

Protected Content