श्री चक्रपाणी अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्वज्ञ महानुभाव पंथातील सर्व सदभक्तांनी प्रथमच पारोळा शहरात या वर्षापासून श्री चक्रपाणी  अवतार दिन साजरा करण्यात आला. परमपूज्य श्री वर्धनस्थ बिडकर मोठेबाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बाबांचे स्वागत सर्वज्ञ सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आले श्री वर्धनस्थ बिडकर मोठे बाबा यांनी आपल्या प्रबोधनात श्री चक्र प्रमाणे बाबा यांच्या विषयी मार्गदर्शन करताना सांगितले की] महानुभाव पंथात संस्कार संस्कृती व धर्माचे पालन केले जाते महानुभाव पंथ हा प्रचिती पंथ आहे. श्री चक्रपाणी  महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले त्याबद्दल बाबांनी सर्वज्ञ सत्संग मंडळाचे कौतुक केले, असेच कार्य दरवर्षी जयंती साजरी करून समाजापुढे एक आदर्श ठेवावा असे उद्गार काढले प्रथमच तालुक्यातील चारशे ते पाचशे महानुभाव पंथातील सद्बभक्त उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजता गंगुबाई नगर येथून देशमुख आप्पा ग्रामसेवक यांच्या घरापासून श्री चक्रपाणि बाबांची पालखीत मिरवणूक काढण्यात आली व विविध मार्गाने फिरून तांबे नगर येथील किशोर पाटील यांच्या घरापाशी मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

या पालखी सोहळ्यात पुरुष व महिला सदभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. किरण पाटील, किशोर पाटील, देशमुख आप्पा ग्रामसेवक ॲड. अशोक पाटील, जनसेवक पी.जी. पाटील, गोविंद मिस्तरी, प्रा.संजय पाटील, अमोल पाटील, सागर पाटील, संजय पाटील, मुका महाजन, डॉ.लालचंद पाटील, ईश्वर पाटील, बारकू गुरुजी, अनिल पाटील, सुदर्शन पाटील, हिरामण पाटील, राजू पाटील, शरद पाटील, अजय पाटील, गोपाल पाटील, शशिकांत पाटील, डी.डी. पाटील, रमेश पाटील, जितेंद्र पाटील, हेमंत पाटील सर्व सदभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी जी पाटील जनसेवक  यांनी मांडले.

Protected Content