साकळी येथील नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत साकळी येथील सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच दिपक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे(चिंचोली), बिडगाव तालुका चोपडा येथील माजी सरपंच प्रकाश पाटील, शांताराम लक्ष्मण पाटील(नायगाव), उंटावद येथील सेवानिवृत्त प्रा.विश्वानाथ पाटील, विकासोचे चेअरमन शशीकांत पाटील, संचालक जगदीश पाटील, सरपंच छोटु भिल, सामाजीक कार्येकर्ते विजय पाटील, विकासो सचिव संजय महाजन, मुरलीधर पाटील, भिकन पाटील, साहेबराव बडगुजर, वाय.जी.नेवे, जिवन पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content