खळबळजनक : अर्धवट शरीर असलेल्या बाळाचा मृतदेह आढळला !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात अर्धवट प्राण्यांनी खाल्लेले नऊ महीन्याच्या बाळाचे  मृतदेह मिळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन यावल पोलीसांनी तात्काळ गावात जावुन त्या बाळाचे अर्धवट अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील सातोद येथील इंदिरानगर परिसरात मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांनी या ठिकाणी पुर्ण नऊ महिन्याचे प्राण्यांनी अर्ध शरीर खाल्लेले बाळ मिळुन आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून  मृतावस्थेत असलेल्या अर्ध शरीराच्या बाळाला ताब्यात घेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. सदरचे बाळ हे कुणाच्या तरी अनैतिक संबंधातुन जन्मास आले असावे, समाजात बदनामी होईल या भितीपोटी या बाळास अशा प्रकारे जन्म दिल्यावर बेवारस सोडून दिले असावा असा अंदाज केला जात आहे.  त्यानुसार पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हॅड कॉन्सटेबल राजेन्द्र पवार व पोलीसांनी घटनेशी संबधीत तपासाला सुरूवात केली आहे. यावल पोलीस ठाण्यात या घटनेशी संबधित बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाई सुरू आहे .

Protected Content