जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबीरात २१ रक्तदात्यांचे रक्तदान

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नियोजन भवनात आज सकाळी १० वाजता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने वतीने रक्तदान शिबीराचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी नियोजन भवानाजवळ शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी रेड प्लस रक्त पेढीच्या तज्ञ डॉक्टरांची परिश्रम घेतले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश मोरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content