Home Cities जळगाव सरस्वती विद्या मंदिरात मराठी राजभाषा दिवस उत्साहात

सरस्वती विद्या मंदिरात मराठी राजभाषा दिवस उत्साहात


जळगाव प्रतिनिधी । येथील सरस्वती विद्या मंदिर मध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी परीपाठा ला मराठीतून प्रकाशित होणारे विविध वृत्तपत्रांचे लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, पुण्यनगरी, तरुणभारत, जनशक्ती, देशोन्नती, देशदूत  यामधील बातम्यांचे प्रकट वाचन केले.

मराठी भाषेतून प्रकाशित होणारे वृत्तपत्रांचे ओळख तसेच विद्यार्थ्यांमध्ये बातम्या वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक ग स चे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी केले .उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल , सविता ठाकरे यांनी केले तर मराठी भाषेचे महत्व व मार्गदर्शन निलिमा भारंबे यांनी केले.सह कार्य शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने , उज्वला ब्राम्हणकर यांनी केले. सुदर्शन पाटील, मयुर कणखर उपस्थित होते.


Protected Content

Play sound