Home क्राईम खोटे नगरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

खोटे नगरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

0
102


जळगाव – लाईव्ह ट्रेन्डस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खोटेनगर स्टॉपजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील आरएल कॉलनी येथे अनिल युवराज पाटील वय ४६ हे वास्तव्यास आहेत.  ११ फेब्रुवारी रोजी अनिल पाटील हे त्यांच्या  दुचाकीने खोटेनगर स्टाफ परिसरातून जात होते. यादरम्यान  (एमएच ३० एएफ ५५०४) या क्रमांकाच्या कासदे अनिल पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल पाटील यांना दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे अशा आशयाच्या अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवार १३ फेब्रुवारी रोजी कारचालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दिनेश पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound