भैरवीताई दिनदर्शिकाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

अमळनेर, प्रतिनिधी | भैरवीताई दिनदर्शिका- २०२२ चे प्रकाशन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाळीसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने उदयोन्मुख नेतृत्व भैरवीताई याच्या दिनदर्शिका- २०२२ चे प्रकाशन चाळीसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या कार्यास व नेतृत्वास बळकटी देण्यासाठी या दिनदर्शिकेचे निर्माण करण्यात आले आहे. माजी आ.स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक जेष्ठ श्रेष्ठ नेते व पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन यासाठी लाभले आहे.ना देवेंद्र फडणवीस नुकतेच चाळीसगाव दोऱ्यावर आले असताना तेथेच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भैरवी वाघ पलांडे यांचे कौतुक केले व शुभेच्या दिल्या.

याप्रसंगी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे ,भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आ गिरीष महाजन, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेशदादा पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिताताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे, आ.चंदुलाल पटेल, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी खासदार एम. के. पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे व अन्य प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.

दरम्यान जनसंघाच्या दिवंगत नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, केंद्रित गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यासह प्रदेश व जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांचा सन्मान राखत ही दिनदर्शिका निर्माण करण्यात आली आहे. १४ पृष्ठ असलेल्या या बहुरंगी दिनर्शिकेत भाजत नेते स्व. उदयजी वाघ व माजी आ. स्मिताताई वाघ यांच्या कार्यावर देखील प्रकाशझोत टाकत युवा नेतृत्व भैरवी वाघ यांचे विविधरंगी पैलू उलगडण्यात आले आहेत. एकंदरीत अतिशय नावीन्यपूर्ण अशी ही दिनदर्शिका असल्याने भाजप कार्यकर्ते व भाजप प्रेमींना चांगलीच भावणार आहे. लवकरच ही दिनदर्शिका सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मानस दिनदर्शिकेच्या प्रकाशकांनी व्यक्त केले आहे.

Protected Content