मार्केट उघडले… तरीही व्यापारी असमाधानी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । मागील साडेचार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनातर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. यात एकल दुकाने सम-विषम स्वरूपात सुरु करण्यात आली मात्र संकुलातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच होती. ती आज सुरु करण्यात आली आहेत. असे असले तरी आठवड्यातील तीन दिवस दुकान बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत व्यापारी संकुलांमधील दुकाने उघडण्याबत एकमत झाल्यानंतर आज ती उघडण्यात आली. मात्र, आठवड्यातील तीन दिवस दुकाने पूर्णपणे बंद ठेवून दुकाने खोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने आठवड्यातील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा नियम घालून दिल्यामुळे व्यापारी नाराज आहेत. नवीन बी. जे. मार्केटमधील व्यापाऱ्यांनी साडेचार महिन्यानंतर व्यवसाय करण्यास परवानगी मिळाल्याने समाधान व्यक्त करत नियमित व्यापार करण्यास परवानगी देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तर काही व्यापाऱ्यांनी साडेचार महिन्यांपासून लॉकडाऊन असतांना दुकान बंद असले तरी देखील त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना वेतन देणे, दुकान भाडे, वीज बिल हे अदा करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली.

फुले मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर
फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर करणे बंधनकारक करण्यात आले होते. साडेचार महिन्यानंतर रामजन्मभूमी अयोध्यात होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनच्या दिवशी व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याची संधी देण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासनाचं आभार मानले आहे. आज व्यापारी संकुल उघडण्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकांची तुरळक गर्दी पाहावयास मिळाली. व्यापारी आज ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

व्यापाऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रया व्यक्त होत असल्या तरी सर्वांचा सूर मात्र एकच आहे गर्दी होणार नाही आणि आमचे व्यवसायही सुरळीत चालतील अशा उपाययोजना प्रशासनाने सुचवाव्यात आम्ही त्यांचे पालन करू, रस्त्यावर व बाजारात गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतरावरून व्यवहार होतील याची काळजी आम्ही घेऊ असे सगळ्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया सेंट्रल फुले मार्केट अध्यक्ष रमेश मताणी, बबलू समदडिया आदींनी व्यक्त
केले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/582515562410124

Protected Content