यावलच्या आसारामनगरात उद्यानाच्या कामाला प्रारंभ

यावल प्रतिनिधी । नगरपरिषद हद्दीतील भुसावळ रोड नजीक असलेल्या आसारामनगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून खुल्या जागेवर उद्यान विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 25 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार असून त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणे व लॉन विकसित करणे तसेच आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे व विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे शोभिवंत झाडेही लावण्यात येणार आहेत.

या कामामुळे आसाराम नगर परिसरामधील सौंदर्य खुलवण्यात मदत होणार असून परिसरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना करमणुकीसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. या कामाची पाहणी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व गटनेता अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, मुबारक तडवी, राजेंद्र फलक, गणेश महाजन, राजेश श्रावगी, परिसरातील नागरिकांसह बांधकाम अभियंता योगेश मदने यांनी केली. कंत्राटदारास योग्य पद्धतीचे काम करण्याच्या सूचना देऊन लवकर काम पूर्ण होण्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

Protected Content