रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करा – अमळनेर ग्रामस्थांची मागणी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुमारे ४० लक्ष रुपये निधीचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याचे काम निवेदेनुसार व गुणवत्ता पूर्वक व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी एम.एस.जे कंपनीकडे विनंती केली आहे.

तालुक्यातील शहापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता गेली अनेक वर्षे उपेक्षित राहिला आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुमारे 40 लक्ष निधीच डांबरीकरण चे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन देखील मागील आठवड्यात जिल्हा परिषद सदस्य जयश्री ताई पाटील यांच्या उपस्थितीत आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या निधीतुन दोन किलोमीटर मंजूर असून रस्त्याचे काम निवेदेनुसार व गुणवत्ता पूर्वक व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी एम.एस.जे कंपनीकडे विनंती केली आहे.

परंतु संबंधित याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा देखील आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. सद्यस्थितीत रस्त्याचं काम सुरु असून आधीचा जुन्या रस्त्यावर डांबर न टाकताच खडीकरण केले जात आहे. त्यामुळे रस्ता मजबूत कसा राहील व काही दिवसात खडी उखडून बाहेर येईल ? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील टप्प्यात रस्ता खड्डेमय झाला असल्याने या रस्त्यावरील वाहन सेवा पूर्णता बंद पडल्याने मागील तीन वर्षापासून यामार्गाने जाणारी शिरपुर बससेवा बंद पडली आहे.

 

Protected Content