सेवानिवृत्त जवानाची मनवेल गावकरी काढणार मिरवणूक

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील सैनिक ईश्वर भागवत पाटील दि. १ फेब्रुवारी रोजी सैन्यदलाच्या देश रक्षणाच्या सेवेतुन सेवानिवृत्त झाले आहे. निवृत्तीनंतर ते आज प्रथमच मानवेल येथे येणार असल्याने त्यांची सवाद्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात येणार आहे.

ईश्वर पाटील हे  भागवत घमा पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते आज शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या जन्मभुमी मनवेल येथे येत आहेत. मनवेल व परिसरातील नागरिकांनी भारत मातेची सेवा करून आलेल्या जवानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मनवेल गाव व परिसरातील नागरीकांच्या वतीने करण्यात आले आहे. ईश्वर पाटील दुपारी तीन वाजता श्री दादाजी दरबार प्रवेशद्वार मनवेल येथुन वाजत गाजत सवाद्य मिरवणूकर निघणार आहे. पुढे मनवेल बसस्थानकजवळ महर्षी वाल्मिक महाराज यांच्या प्रतिमेला नमन करून पुष्पहार घातला जाईल. पुढे भारतरत्न डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर यांची प्रतिमा पुजन करून पुष्पहार घातला जाईल. मग स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला जाईल. यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये पुष्पहार व दर्शन घेतले जाईल. दादाजी दरबारमध्ये पुष्पहार व दर्शन घेतले. अशा प्रकारे मिरवणूक काढण्यात येणार असून, मिरवणुकीचे सांगता ईश्वर पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे.

Protected Content