नूतन महापौर भारती सोनवणे यांचा शिंपी समाज महिला मंडळातर्फे सत्कार

WhatsApp Image 2020 02 03 at 3.38.54 PM 1

जळगाव , प्रतिनिधी | शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने नुकताच महापौर पदि निवड झाल्याबद्दल भारती सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . महापौर सोनवणे यांना ८ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे आमंत्रण देण्यात आले .

महापौर भारती सोनवणे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की,  शिंपी समाज महिला मंडळाच्या सर्व भगिनीं अतिशय चांगले काम करत असुन बेटी बचाव बेटी पढाव , महिला सबलीकरण असे चांगले कार्यक्रम घेत आहेत. मनपा जळगावच्या महापौर नात्याने महिला भगिनीसाठी मी सदैव तत्पर सेवा करण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहिल अशी ग्वाही दिली. शिंपी समाज महिला अध्यक्षा रेखा निकुंभ ,पदाधिकारी आशा जगताप, विद्या सोनवणे, वैशालीभांडारकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी नामदेव भजनीमंडळ उपाध्यक्ष सरोज खैरनार, निर्मला शिंपी, शाखा महिला पदाधिकारी सारिका शिंपी, प्रियंका शिंपी, शोभा जगताप, सारिका जगताप, मिना कापुरे, वर्षा शिंपी, स्नेहा सोनवणे, सोनल बाविस्कर, सुनिता सन्नासे, स्वाती सोनवणे, शुभांगी बाविस्कर, वैशाली शिंपी, सुनिता भांडारकर, संगीता कापुरे, तेजस्विनी कापुरे, प्रियंका निलम शिंपी, गाढे मेडॅम, शोभा भांडारकर आदींसह महिला उपस्थित होत्या.

Protected Content